बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन तेथील लोकांना आरसा दाखवला, त्याची जोरदार चर्चा आहे.
जावेद अख्तर यांचं भारतीयांकडून भरपूर कौतुक होत आहे पण, पाकिस्तानी जनतेकडून टीकांचा भडीमार झाल्याचं पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानी जनता सोशल मीडियावर अख्तर यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहे.
जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवणारा पाकिस्तानी गायक अली जफर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
पाकिस्तानमध्ये आयोजित फैज फेस्टिव्हलमध्ये जावेद अख्तर यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील जावेद अख्तर यांच्या भाषणाचं कौतुक करणाऱ्या पाकिस्तानी प्रेक्षकांना आता लक्ष्य केलं जात आहे.
या प्रकरणावर जावेद अख्तर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, तेव्हा या उपस्थित सर्व पाकिस्तानी नागरिकांना माझ्या वक्तव्यावर टाळ्या वाजवल्या होत्या. ते माझ्याशी सहमत होते. असे अनेक लोक आहेत ज्यांना भारत आवडतो आणि त्यांना भारतीयांशी नातं हवं आहे.
दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये, जेव्हा जावेद अख्तर पाकिस्तानी नागरिकांसमोर मुंबई हल्ल्याबाबत वक्तव्य करत पाकिस्तानला जबाबदार ठरवलं. तेव्हा तिथे बसलेले प्रेक्षक टाळ्या वाजवत असल्याचं दिसत आहे.
पाकिस्तानमधील कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना आरसा दाखवला आहे.
यावेळी जावेद अख्तर यांनी म्हटलं की, आमच्या शहरावर हल्ला झाला ते आम्ही पाहिलं. त्या हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत.''
''एखाद्या भारतीयाने याबद्धल विचारलं तर वाईट वाटून घेऊ नका. जावेद अख्तर यांचं हे वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आहे.