2024 चा पहिला दिवस जपानसाठी शुभ ठरला नाही.



देशात एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.



नववर्षाचे स्वागत सुरु असतानाच सोमवारी (1 जानेवारी) उत्तर मध्य जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला..



जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चर्सच्या किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा दिला..



जपानमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किनारी भागात राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर उंच ठिकाणांवर जाण्याचा सल्ला दिला आहे.



जपानच्या हवामान खात्यानं इशारा दिला आहे की, काही भागांत पाच मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.



भूकंपाची तीव्रता इतकी होती की, रेल्वे आणि मेट्रोही थांबवण्यात आल्या होत्या.



जपानमधील तीस हजार घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.



सरकारनं आणखी काही काळ भूकंपाचे धक्के जाणवू शकतात, असा इशारा दिला आहे.



त्यामुळे जपानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणवर भूकंपाच्या धक्क्यांमुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.