जपानमध्ये मुलींवर विचित्र निर्बंध लादण्यात आले आहेत.



अलीकडेच जपानमधील शाळांनी मुलींना पोनीटेल बांधण्यास बंदी घातली आहे.



मुलींनी पोनीटेल बांधल्याने मुले उत्तेजित होऊ शकतात, असं अजब कारण जपानच्या शाळांनी दिलं आहे.



मुलींच्या मानेचा मागचा भाग मुलांना लैंगिक उत्तेजित करू शकतो, असा या बंदीमागचा विचित्र तर्क आहे.



त्यामुळेच आता तिथल्या शाळेत शिकणाऱ्या मुली पोनीटेल बांधून शाळेत जाऊ शकत नाहीत.



जपानमधील फुकुओका भागातील 2020 मध्ये अनेक शाळांमध्ये मुलींच्या पोनीटेलच्या नियमाबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते.



सर्वेक्षणानुसार, पोनीटेलमध्ये मुलींची दिसणारी मान पुरुषांना उत्तेजित करते, असे समोर आले.



एकीकडे शाळा असे अजब नियम लादत असताना दुसरीकडे प्रशासन नियम जारी करताना विद्यार्थ्यांना योग्य ते स्पष्टीकरणही देत​नाही.