देशात कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग मंदावला असून मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 503 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे काल देशात 3116 नवे रुग्ण आढळले होते तर, 47 जणांचा मृत्यू झाला होता त्यामुळे तुलनेने आज रुग्णवाढ आणि मृत्यू कमी झाले आहेत देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 36 हजार 168 वर पोहोचली आहे देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मकतेचे प्रमाण 0.47 टक्के झाले आहे रविवारी दिवसभरात कोरोनावर उपचार घेऊन बरे झालेल्या 4377 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 4 कोटी 24 लाख 41 हजार 449 इतकी आहे कोरोनामुळे आतापर्यंत देशात एकूण 5 लाख 15 हजार 877 लोकांचा मृत्यू झाला आहे देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासात 4 लाख 61 हजार 318 कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत