बॉलिवूड सेलिब्रिटींचा सध्या साऊथ इंडस्ट्रीकडे जास्त कल आहे.

आता या यादीत जान्हवी कपूरचाही समावेश झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच साऊथमध्ये डेब्यू करताना दिसणार आहे.



रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरनं बॉलिवूडमध्ये पदार्पणानंतर साऊथ इंडस्ट्रीमध्येही डेब्यू करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटांमधून केली होती.

अखेर जान्हवी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार असून ती तेलुगु स्टार ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

पुढच्याच महिन्यात या चित्रपटाचं शुटींग सुरू होणार असून 2024 मध्ये चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतंच या चित्रपटाचे पोस्टर लाँच केलं आहे.

निर्मात्यांकडून अद्याप याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही.

बॉलिवूड स्टार आमिर खान देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं वृत्त समोर येत आहेत.