मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर सक्रिय असते.
रिंकू ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच एक खास व्हिडीओ रिंकूनं शेअर केला आहे.
या व्हिडीओमधील रिंकूच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
काही नेटकऱ्यांनी रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे.
रिंकूनं पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये रिंकू ही खास लूकमध्ये दिसत आहे.
मोत्याचे इअरिंग्स, मोत्याचं गळ्यातलं आणि पिंक कलरचा प्रिंटेड ड्रेस अशा लूकमध्ये रिंकू दिसत आहे.
रिंकूच्या या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
'बोगस गाणं निवडलंस'. रिंकूच्या या व्हिडीओला जवळपास 266 नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.