जान्हवी कपूरने उटी व्हॅकेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये आपण प्रचंड खुश असल्याचं तिनं म्हटलं आहे. यामध्ये जान्हवी सायकलिंगही करताना दिसतेय. 'उटी डायरीज' असं कॅप्शन तिने या व्हिडीओखाली दिलं आहे. यावेळी तिच्यासोबत ओरहान आणि खुशी कपूरदेखील होते. जान्हवीने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय. हॉरर कॉमेडी असलेला चित्रपट 'रुही' मध्ये ती दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव होता.