दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. या घटस्फोटानंतर समंथाला सोशल मीडियावरून ट्रोल करण्यात आलं. तिला समाजाकडून अवहेलनाही झेलावी लागली. परंतु, एवढे सगळी होऊनही तीने धीर सोडला नाही. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करत समंथा पुढे जात राहिली घटस्फोटाच्या निर्णयानंतर समंथा आता पुन्हा एकदा नवीन आयुष्य जगण्यास सज्ज झाली आहे. यापुढे जर हक्काची आणि प्रेमाची व्यक्ती शोधण्यात यश मिळालं, तर नक्कीच मी त्याचं स्वागत करेन असं समंथाने म्हटलं आहे. समंथाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये समंथाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. समंथाच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. घटस्फोटानंतर समंथाला ट्रोलिंगचा समाना करावा लागत असला तरी सध्या ती खूप आनंदात आहे.