अभिनेत्री जान्हवी कपूरच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. जान्हवी कपूर सध्या तिच्या गुड लक जेरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेत्रीचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. अनेकदा इन्स्टाग्रामवरही अभिनेत्रीचा सिझलिंग आणि फ्रेश लूक पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा जान्हवीच्या नव्या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. डीप नेकलाइन मॅक्सी ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे. जान्हवी कपूरचा हा अवतार सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. जान्हवी कपूर या ड्रेसमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे.