छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सून मानली जाणारी दीपिका सिंह सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंह आज तिच्या लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या चाहत्यांची यादीही सातत्याने वाढत आहे. आता पुन्हा एकदा दीपिकाच्या धमाकेदार परफॉर्मन्सने सर्वांनाच चकित केले आहे. 'दिया और बाती हम' या सुपरहिट शोमध्ये दीपिकाने संध्या नावाच्या सुसंस्कृत सून आणि आदर्श पत्नीची व्यक्तिरेखा अतिशय सुंदरपणे साकारली होती. आता दीपिका लेटेस्ट फोटोमध्येही एकदम सिझलिंग दिसत आहे.