जॅकलिन फर्नांडिसच्या स्टायलिश अदांवर नेटकरी फिदा ‘अलादिन’ या चित्रपटातून जॅकलिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या अभिनयाने आणि मनमोहक अदांनी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. जॅकलिनने कलाविश्वात पदार्पण केल्यापासून तिची कायम चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. जॅकलिन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. जॅकलिन ही अभिनयाप्रमाणे ग्लॅमरस फोटोंसाठी ओळखली जाते. या लूकमध्ये जॅकलिन प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. (photo credit: @jacquelinef143/IG)