बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही गेली काही दिवस तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

तिने काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीच्या 'शेप ऑफ यू' या टॉक शोमध्ये सहभाग घेतला.

या शोमध्ये जॅकलिननं तिला आलेल्या एकटेपणाबद्दल सांगितलं.

जॅकलिननं सांगितलं की, '2020 साली मला एकटेपणा जाणवत होता. त्यावेळी कोरोनामुळे अनेक लोक मुंबईमध्ये एकटे राहात होते. त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत नव्हते.

अशा वेळी तुमच्यासोबत बोलायला लोक नाहियेत तसेच तुम्ही कोणासोबत गप्पा मारू शकत नाहित.'

पुढे तिनं सांगितलं, ' मला एकटेपणामुळे डिप्रेस राहायचे नव्हते, मला मित्रमैत्रीणींना तसेच माझ्या कुटुंबाला हे दाखवायचे नव्हते की, मी एकटी आहे किंवा दु:खी आहे.

अशा वेळी मी थेरेपिस्टची मदत घ्यायचा निर्णय घेतला. काही लोकांना वाटते की थेरेपिस्टकडे जाणं चुकीची गोष्ट आहे पण ज्यांना एकटेपणाचा त्रास होत आहे त्यांनी थेरेपी घ्यावी. थेरिपिस्टमुळे सेल्फ रिफ्लेक्शन होऊ शकते.'