मनी लॉंड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला आरोपी करण्यात आलं आहे. सुकेश चंद्रशेखरसोबत तिलाही आरोपी करण्यात आलं आहे. ईडीने ही कारवाई केली आहे. जॅकलिनला सुकेशने 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. हा पैसा सुकेशने केलेल्या 200 कोटींच्या फसवणुकीतील होता. सुकेशने जॅकलीनला 52 लाख किमतीचा घोडा भेट दिला होता. नऊ लाख किमतीचे पर्शियन मांजर, 10 कोटीच्या भेटवस्तू दिल्या होत्या. गुन्ह्याचा पैसा वापरल्यामुळे जॅकलिन आज अडचणीत आली आहे. जॅकलिनला सध्या अटक केली जाणार नाही भविष्यात जॅकलिनला अटक होण्याची शक्यता आहे.