साऊथ सिनेमानंतर टीव्हीकडे वळलेली प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने नुकतेच मिका सिंगच्या 'स्वयंवर: मिका दी वोहती' या शोचे विजेतेपद पटकावले. या शोदरम्यान आकांशा चांगलीच चर्चेत आली होती. शो सोडल्यानंतर देखील आकांसा खूप चर्चेत आहे. या शोमुळे मिका आणि आकांक्षाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे 'मिका दी वोहती' बनताच आकांक्षा पुरी खूपच बोल्ड झाली आहे. आकांशा चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आकांक्षा तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते. आता पुन्हा एकदा तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा मोडल्या आहेत. आकांक्षाने नुकतंच इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत.