फणस हे विशेषकरुन भाजी बनवण्यासाठी ओळखलं जातं. उत्तर भारतात याची भाजी करण्यासाठी शेती केली जाते. समारंभात विशेष करुन फणसाची भाजी केली जाते. फणसामुळे अनेक आजारांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. फणस हे श्रीलंका आणि बांग्लादेशाचं राष्ट्रीय फळ आहे. तसेच फणस हे तमिळनाडू आणि केरळचं राज्य फळ देखील आहे. महाराष्ट्रात कोकण पट्ट्यात विशेषकरुन फणसाचं उत्पादन घेतलं जातं. फणस हे जगातलं सर्वात मोठं आणि वजनदार फळ असल्याचं म्हटलं जातं. साधारणपणे फणसाचं वजन हे दहा किलो ते 25 किलोपर्यंत असू शकते. फणसाचं जितका फळ म्हणून वापर केला जातो तितकाच भाजी बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो.