iVOOMi Energy भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. कंपनीने JeetX लिमिटेड एडिशन स्कूटर लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. नवीन स्कूटरची किंमत 1.02 लाख रुपये आहे. ही स्कूटर मर्यादित कालावधीसाठी 98,000 रुपयेच्या विशेष सवलतीच्या किंमतीवर खरेदी करू शकतात. ही स्कूटर 10 नोव्हेंबरपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे. लिमिटेड एडिशन JeetX (JeetX) स्टॅंडर्ड मॉडेलपेक्षा महाग आहे.