स्मृती मानधना हिने नवीन लँड रोव्हर रेंज रोव्हर इव्होक कार खरेदी केली आहे. या कारची प्रारंभिक किंमत 72.09 लाख रुपये आहे. स्मृतीने सिलिकॉन सिल्व्हर शेडमध्ये रेंज रोव्हर इव्होकचे टॉप व्हेरिएंट खरेदी केले आहे. ही SUV पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. जी माईल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानासह येते. स्मृती मानधनाकडे मारुती सुझुकी डिझायर आणि ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही देखील आहेत.