बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीचा आगामी 'सेल्फी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या फोटोत अक्षय आणि इमरान निसर्गरम्य ठिकाणी बाईक चालवताना दिसत आहेत. तर अक्षय कुमारने इमरान हाश्मीसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. करण जोहरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. 'सेल्फी' हा सिनेमा 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'ड्रायव्हिंग लायसन्स' या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक असणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी दिसणार आहेत. तर या सिनेमाचे दिग्दर्शन राज मेहता करत आहेत. लवकरच शूटिंग सुरू होणार आहे अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीच्या आगामी 'सेल्फी' सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.