एखादा पदार्थ तयार करताना, त्यावर प्रक्रिया करताना त्यात साखरेचा वापर करणे म्हणजेच अतिरिक्त साखर होय.
यामध्ये मध, मॅपल सिरप आणि फळांचा रस यासारख्या आरोग्यदायी पर्यायांचा समावेश करणे योग्य राहिल.
दोन वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांनी दररोज 25 ग्रॅमपेक्षा कमी साखरेचे सेवन केले पाहिजे.
खरंतर, फळे आणि भाज्या यांसारख्या पदार्थांमध्ये देखील साखर असते.
मात्र तज्ज्ञ आपल्याला 'अॅडेड शुगर' कमी करण्याचा सल्ला देतात. ज्यामध्ये कृत्रिम साखरेचा समावेश असतो,
दररोज सहा टेबलस्पून पेक्षा कमी साखरेचे सेवन करावे. दोन वर्षाखालील मुलांना मात्र अतिरिक्त साखर देऊ नये.
मिठाईशिवाय उत्सव साजरा करा. साखरेस पौष्टिक पर्यायी पदार्थ शोधा. ताज्या फळांचा वापर करा.
भरपूर पाणी प्या आणि तुमच्या मुलांनाही तेच करायला सांगा. यामुळे तुमच्या रक्तप्रवाहावर साखरेचा होणारा परिणाम कमी होईल.