अनुष्का शर्माकडून आरसीबीच्या विजयाचं सेलिब्रेशन

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pinterest.com

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाबला क्वालिफायर 1 मध्ये 8 विकेटनं पराभूत केलं. आरसीबी 2016 नंतर आता आयपीएल फायनलला खेळेल.

Image Source: Pinterest.com

आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना 101 धावांवर रोखलं. यानंतर आरसीबीनं ही धावसंख्या 10 ओव्हरमध्येच पार केली. आरसीबीनं 10 ओव्हरमध्ये 2 बाद 106 धाव केल्या.

Image Source: Pinterest.com

आरसीबीनं 2016 नंतर पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Image Source: Pinterest.com

9 वर्षानंतर रजत पाटीदारच्या नेतृत्त्वात आरसीबी आयपीएल फायनल खेळणार आहे.

Image Source: Pinterest.com

पंजाब किंग्ज गुणतालिकेत पहिल्या स्थानावर राहिलं. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

Image Source: Pinterest.com

आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार यानं विजयी षटकार मारल्यानंतर अनुष्का शर्माच्या आनंदाला पारावार उरला नाही.

Image Source: Pinterest.com

मॅच जिंकताना तिच्या चेहऱ्यावर आनंद तर डोळ्यात अश्रू होते.

Image Source: Pinterest.com

यावेळी विराट कोहलीची प्रतिक्रिया देखील व्हायरल होतं आहे. विराटनं अनुष्काच्या दिशेनं इशारा केला.

Image Source: Pinterest.com

विराट कोहलीनं एक बोट दाखवत अनुष्काच्या दिशेनं इशारा केला. आता आरसीबी विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

Image Source: Pinterest.com

आरसीबीला 18 व्या हंगामाचं विजेतेपद मिळवण्याची मोठी संधी आहे.

Image Source: Pinterest.com