शाहरुख खानला 22 मे रोजी डिहायड्रेशनमुळे
अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.
त्याची पत्नी गौरी खान हिला ही माहिती मिळताच तिनेही तात्काळ हॉस्पिटल गाठले.
अभिनेत्री जुही चावलानेही तिचा मित्र आणि
KKR टीम पार्टनर शाहरुखच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
पण आता शाहरुखला डिस्चार्ज देण्यात आला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
शाहरुखला उष्माघाताचा त्रास होता,
त्यामुळे त्याला तात्काळ अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रिपोर्ट्सनुसार, आता त्याची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून
डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या बातमीमुळे शाहरुखच्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय.
पण आता शाहरुख त्याच्या संघाची फायनल पाहण्यासाठी मैदानात येणार का याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.