रोहित शर्मा : रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्त्व करणार आहे. पहिल्या टी-20 वर्ल्ड कपासून प्रत्येक टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालाय.
हार्दिक पांड्या : मुंबईचा कॅप्टन असलेला हार्दिक पांड्या टीम इंडियाचा उपकॅप्टन म्हणून टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होईल.
सूर्यकुमार यादव : सूर्यकुमार यादव दुखापतीनंतर मुंबई इंडियन्समध्ये परतला. चार महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर त्यानं आयपीएलमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकं केलीत.
जसप्रीत बुमराह : जसप्रीत बुमराह सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून भारताचा प्रमुख बॉलर म्हणून संघात त्याला स्थान मिळालं आहे. त्यानं आयपीएलमध्ये 20 विकेट घेतल्या आहेत.
गेराल्ड कोत्झी : दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर गेराल्ड कोत्झी मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. तो आफ्रिकेचा मुख्य बॉलर आहे.
टीम डेविड : मुंबईकडून खेळणाऱ्या टीम डेविडला देखील ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळालेलं आहे.
मोहम्मद नबी : अफगाणिस्ताननं ऑलराऊंडर मोहम्मद नबीला संघात स्थान दिलं आहे.
नुआन तुषारा : नुआन तुषाराची श्रीलंकेच्या संघात निवड झालीय. मुंबईकडून त्यानं काही सामने खेळले आहेत.
रोमारिओ शेफर्ड : रोमारिओ शेफर्ड मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. तो वेस्ट इंडिजकडून वर्ल्डकपमध्ये खेळेल.
हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव : हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर टीम इंडियाची मदार असेल.