दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली आणि सामनाही खिशात घातला.



राजस्थानकडून आर आश्विनने कारकिर्दीतील पहिलं वहिलं अर्धशतक झळकावलं. पण दिल्लीच्या मार्श वॉर्नर जोडीच्या तुफान खेळीमुळे राजस्थानचा पराभव झाला.



राजस्थान संघाला यंदाच्या हंगामात तीन शतकं लगावणाऱ्या जोस बटलरकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण बटलर 7 धावा करुन स्वस्तात माघारी परतला.



पण त्यानंतर वन डाऊन थेट आश्विन मैदानात अवतरला आणि त्याने संघाटा डाव एकहाती सावरला



दुसऱ्या बाजूने यशस्वी, संजू हे महत्त्वाचे फलंदाज बाद होत होते. पण आश्विनने टिकून राहत 38 चेंडूत 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.



20 षटकानंतर सहा गडी गमावत राजस्थानने 160 धावा केल्या ज्यामुळे दिल्लीसमोर विजयासाठी 161 धावांचे आव्हान होते. 



राजस्थान संघाने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाने शून्य धावांवर पहिली विकेट गमावली.



पण त्यानंतर मात्र मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने टिकून राहून दमदार फलंदाजी केली.



दोघांनी तुफान फटकेबाजी करत संघाचा विजय पक्का केला.



मार्श 89 धावा करुन 18 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण नंतर पंतने लागोपाठ दोन सिक्स खेचले तर वॉर्नरने स्वत:चं अर्धशतक पूर्ण करत संघाला 8 विकेट्सनी विजय मिळवून दिला.