रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीसाठी आयपीएलचा पंधरावा हंगाम चांगला ठरला नाही. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी विराट कोहलीनं आरसीबीच्या संघाचं कर्णधार पद सोडलं आणि आता तो फलंदाजीमध्येही संघर्ष करताना दिसत आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आज सुरू असलेल्या सामन्यात विराट कोहली शून्याबाद बाद झाला. या सामन्यात विराट कोहली गोल्डन डकचा शिकार ठरला. आयपीएलमध्ये चौथ्यांदा विराट कोहली खाते न उघडता माघारी परतला आहे. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध त्यानं 41 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात कोलकाताविरुद्ध त्यानं 12 धावा केल्या. राजस्थानविरुद्ध तिसऱ्या सामन्यात त्याला फक्त पाच धावा करता आल्या. मुंबईविरुद्ध त्यानं 48 धावांची खेळी केली आणि आज लखनौविरुद्ध सामन्यात शून्यावर बाद होऊन माघारी परतला.