पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी भारतीय संघाचा लाडका गब्बर आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार पिंक व्हिलाच्या रिपोर्टनुसार, धवन त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. शिखर धवननं त्याच्या पहिल्या चित्रपटाचं शूटिंगही पूर्ण केलं आहे. मात्र, या चित्रपटाचे शीर्षक अद्याप समोर आलेलं नाही. रिल्स बनवण्याची आवड असणारा शिखर कायम सर्वांचे मनोरंजन करत असतो. त्यामुळे अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्याची संधी मिळाल्यावर त्यानं लगेच होकार दिला. निर्मात्यांना शिखर धवन देखील संबधित भूमिकेसाठी परफेक्ट वाटला. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांत झळकत आहे. शिखर धवन गेल्या वर्षाच्या अखेरीस अक्षय कुमार स्टारर चित्रपट राम सेतूच्या सेटवर दिसला होता.