बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा आज (17 मे) आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे.
. नुसरतने 'जय संतोषी माँ' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली.
नुसरत गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे.
सुरुवातीला तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटले होते. मात्र, आता ती बॉक्स ऑफिसवर कल्ला करत आहे.
'लव्ह, सेक्स और धोका', 'प्यार का पंचनामा' सारख्या चित्रपटातून नुसरत भरुचाला खरी ओळख मिळाली होती. नुसरतने टीव्ही मालिकांमधून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.
नुसरतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीमधून केली होती. ती 2002 मध्ये झी टीव्हीच्या 'किटी पार्टी' या सीरियलमध्ये दिसली होती.
यानंतर तिने सोनी वाहिनीवरील 'सेव्हन' या मालिकेतही काम केले. 'किटी पार्टी' मालिकेतमधली तिची भूमिका अगदी छोटीशीच होती.
तर, 'सेव्हन’ या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकली होती. या मालिकेत ती एका ‘सुपर पॉवर गर्ल’च्या पात्रात दिसली होती.
नुसरत भरुचाने 2011 मध्ये कार्तिक आर्यनसोबत लव रंजन दिग्दर्शित 'प्यार का पंचनामा' या चित्रपटाने खूप प्रसिद्धी मिळवली. हे तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश होते.
'प्यार का पंचनामा' नंतर नुसरत 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. कार्तिक आर्यनसोबतचा हा तिचा 100 कोटींचा गल्ला पार करणारा पहिला चित्रपट होता.