देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गात मोठी घट झाली आहे



देशात नवीन कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे



देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 569 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे



सोमवारी दिवसभरात 2 हजार 467 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत



कोरोनावर मात केलेल्या नव्या रुग्णांमुळे आता देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 400 वर पोहोचली आहे



देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 84 हजार 710 रुग्णांन कोरोनावर मात केली आहे



देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 191 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत



कोरोना महामारीनं आतापर्यंत भारतात 5 लाख 24 हजार 260 जणांचा मृत्यू झाला आहे



सध्या देशात 16 हजार 400 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत



केंद्रीय आरोग्य मंत्रायलाने ही माहिती दिली आहे