मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडला यश मिळवून देणारा सलामीवीर जेसन रॉयनं आयपीएलच्या पंधराव्या मोसमातून आपलं नाव मागे घेतलंय. गुजरात टायटन्सने जेसन रॉयला दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. जेसननं आयपीएलमध्ये सहभागी होणार नसल्याच्या निर्णयाची माहिती गुजरात टायटन्सलाही दिली आहे. जेसन रॉयची माघार ही गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का आहे. जेसनच्या जागी नव्या खेळाडूला संघात संधी मिळेल. नुकत्याच संपलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये जेसन रॉयनं क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं. बराच काळ बायो बबलमध्ये राहून येणाऱ्या आव्हानाचा दाखल देत जेसनने आयपीएलमधून माघार घेतली आहे.