आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांची 11 लाख 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यातील ही स्थावर मालमत्ता आहे
दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कार्ती यांच्या विरोधात प्रोव्हिजनल ऑर्डर जारी करण्यात आली आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम हे तामीळनाडूमधील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत.
आयएनएक्स मीडिया प्रकरणी झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी कार्ती यांना अटक करण्यात आली आहे.
लंडनला गेलेले कार्ती चेन्नई विमानतळावर परत येताच त्यांना अटक करण्यात आली
या प्रकरणी कार्ती यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता
आयएनएक्स मीडियामध्ये 2007 साली 300 कोटींची परकीय गुंतवणूक गैरपद्धतीने आणण्यासाठी कार्ती यांनी साडेतीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे
यूपीए सरकारच्या कार्यकाळात म्हणजे पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्रीपदी असताना हा प्रकार घडला होता.
वडिलांच्या नावाचा वापर करुन कार्ती यांनी लाच मागितल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीने मॅजिस्ट्रेटसमोर केला होता.