देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसतोय.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 10,158 नवे रुग्ण आढळलेत.

देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 44,998 वर पोहोचलीये.

11 एप्रिलच्या तुलनेत 12 एप्रिल रोजी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झालीये.

11 एप्रिल रोजी देशात एकूण 7,830 नवे कोरोनाबाधित आढळून आले होते.

दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,149 नवे रुग्ण आढळले आहेत.

दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट 23.8 टक्क्यांवर पोहोचलाय.

काल (बुधवारी) राज्यात कोरोनाच्या 1,115 रुग्णांची नोंद.

मुंबईत सध्या सक्रिय रुग्णसंख्या 1577 वर पोहोचली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली एम्सनं, तसेच मुंबईतही महानगरपालिकांच्या रुग्णालयांमध्ये कोरोना मास्क वापरणं अनिर्वाय केलंय.