सध्या देशात कोरोना प्रादुर्भावात वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय.

दिवसागणिक देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यातही वाढ होतेय.

गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाच्या 6050 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीये.

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात नव्या रुग्णांमध्ये वाढ झालीये.

सध्या देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 28,303 वर पोहोचलीये.

गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यापूर्वी एक दिवसअगोदर म्हणजेच, गुरुवारी 5,335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीये.

कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 14 रुग्णांचा मृत्यू झालाय.

आतापर्यंत देशात 5 लाख 30 हजार 943 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय.

देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 41 लाख 85 हजार 858 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.