देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येनं धाकधूक वाढवलीये. सलग चार दिवस देशात 10 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद केली जातेय. आज मात्र नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 24 तासांत देशात 9111 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलीये. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 60313 वर पोहोचलीये. दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरातमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसतेय. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यात. देशात सक्रिय रुग्णसंख्या 0.13 टक्के, तर रिकव्हरी रेट 98.68 टक्क्यांवर पोहोचलाय. महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंमध्ये 71 टक्के ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.