जंगले आणि त्यांचे महत्त्व याबद्दल जागरुकता निर्माण करणे हे या दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.



2012 मध्ये यूएन जनरल असेंब्लीने 21 मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणून घोषित केला.



हा दिवस लोकांना जंगलांचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी साजरा केला जातो.



हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी, जंगलांच्या शाश्वत व्यवस्थापनासह त्यांच्या संसाधनांचा विवेकपूर्ण वापर करणे आवश्यक आहे.



हे वर्तमान आणि भावी पिढ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी उपयुक्त तसेच गरजेचे आहे.



या दिवशी, अनेक एजन्सी देशांना वृक्ष लागवड मोहिमेसारख्या जंगल आणि झाडांचा समावेश असलेले उपक्रम आयोजित करण्यास सांगतात.



2022 ची थीम वने आणि शाश्वत उत्पादन आणि उपभोग (Forests and sustainable production and consumption) आहे.