भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे.
त्यामुळे ही सजावट मंदिरामध्ये करण्यात आली होती.
गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाचे विलोभनीय रुप विराजमान झाले.
फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभा-यासह
प्रवेशद्वारावर शेषनागाच्या विविधरंगी भव्य फुलांच्या भव्य प्रतिकृती साकारुन सजावट करण्यात आली.
या दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता
गणेश जयंतीनिमित्त मंदिरात ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला.
तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने असे धार्मिक विधी देखील पार पडले.
भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. त्यामुळे ही सजावट मंदिरामध्ये करण्यात आली होती.