यंदा कॉमनवेल्थ गेम्स इंग्लंडमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहेत. या भव्य स्पर्धेसाठी बॉक्सर लवलिना आणि निखतनं एन्ट्री मिळवली आहे. भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने पायाला दुखापत झाल्यामुळे यातून माघार घेतली. कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी पात्रता सामन्यांत निखतने 50 किलो वजनी गटात विजय मिळवला. निखतने तिने हरयाणाच्या मिनाक्षीला 7-0 ने मात देत विजय मिळवला. दुसरीकडे लवलिनाने रेल्वेकडून खेळणाऱ्या पुजाविरुद्ध दमदार विजय मिळवला. मागील वेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेरीने पदक मिळवलं होतं. पण मेरीच्या जागी आता युवा आणि तडफदार लवलीन आणि निखतने स्पर्धेत एन्ट्री मिळवली आहे. दोघींकडूनही सर्व भारतीयांना पदकाची अपेक्षा आहे. कॉमनवेेल्थ गेम्सना काही दिवस शिल्लक असल्याने सर्व खेळाडू कसून सराव करत आहेत