देशात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे



गेल्या 24 तासांत 8582 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे



देशातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत असताना गेले काही दिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे



आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची धोक्याचा अंदाज वर्तवला आहे



देशात शनिवारी दिवसभरात 4 हजार 435 रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे



सध्या एकूण 44 हजार 513 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात नवी माहिती जारी केली आहे



देशात आतापर्यंत पाच लाख 24 हजार 761 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे



गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2922 नव्या रुग्णांची भर पडली असून 1392 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत



महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरातील असून मुंबईत 1745 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे