इतिहास रचण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये दाखल झालाय.



भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत.



परंतु, या फोटोंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दिसला नाही. ज्यामुळं चाहते सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.



इंग्लंड दौऱ्यात भारतीय पुढे ढकलण्यात आलेल्या सामन्यात व्यतिरिक्त तीन सामन्याची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.



बीसीसीआयनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, जसप्रीत बुमराह, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा. मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी आणि केएस भारत दिसत आहेत.



भारत- इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना 1 जुलै- 5 जुलै दरम्यान खेळला जाणार आहे. या मालिकेत भारत 2-1 नं आघाडीवर आहे.