आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे.



या मालिकेत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या संघाचं कर्णधारपद संभाळणार आहे.



या मालिकेसाठी महाराष्ट्राचा फलंदाज राहुल त्रिपाठीला प्रथमच संधी मिळाली आहे. तर यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनचे पुनरागमन झालंय.



आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरात टायटन्ससाठी दमदार कामगिरी केली. करणाऱ्या राहुल तेवतियाला संघात स्थान न मिळाल्यानं त्यानं नाराजी व्यक्त करून दाखवली आहे.



आयपीएलच्या पंधराव्या हंगामात राहुल तेवतियां एकट्याच्या जोरावर गुजरातला अनेक सामने जिंकून दिले आहेत.



परंतु, त्याला अद्याप भारतीय संघात संधी मिळालेली नाही. निवडकर्त्यांच्या निर्णयामुळं निराश झालेल्या तेवतिया यांनी ट्विटरवर आपलं दुःख व्यक्त केलंय.



आयपीएल’मध्ये सनरायजर्स हैदरबादकडून चारशेहून अधिक धावा काढणारा त्रिपाठी हा एकमेव नवा चेहरा या संघात आहे.



याचप्रमाणे राजस्थान रॉयल्सला अंतिम फेरीपर्यंत नेणारा कर्णधार सॅमसनलाही कारकीर्द सावरण्याची आणखी एक संधी मिळालीय.



आयर्लंड दौऱ्यात हार्दिक पांड्याकंड संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलंय. भुवनेश्वर कुमार हा संघाचा उपकर्णधार आहे.