भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी आजचा दिवश खूप खास आहे.



आजच्या दिवशी 15 वर्षापूर्वी रोहित शर्मानं भारताकडून आयर्लंडविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.



यासंदर्भात नुकतंच रोहित शर्मानं ट्वीट केलं. ज्यात भारतासाठी नेहमी चांगली कामगिरी करण्याचा त्याच्या प्रयत्न राहील, असंही त्यानं म्हटलंय.



रोहित शर्मानं आतापर्यंत 45 कसोटी, 230 एकदिवसीय आणि 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.



एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 9 हजार 283, कसोटीत 3 हजार 137 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 313 धावा केल्या आहेत.



रोहितच्या नावावर कसोटीत 8, एकदिवसीय सामन्यात 29 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार शतक केली आहेत.



भारत आणि इंग्लंड यांच्यातील रिशेड्युल कसोटी सामना येत्या 1-5 जुलैदरम्यान खेळाला जाणार आहे.



हा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.



बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.