साऊथ फिल्म इंडस्ट्रीची सुपरस्टार नयनतारा नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. 9 जून रोजी तिने चित्रपट निर्माता विग्नेश शिवनसोबत सात फेरे घेतले.



तामिळनाडूतील महाबलीपुरममध्ये हा लग्नसोहळा अतिशय आलिशान पद्धतीने पार पडला.



नयनतारा आणि विग्नेश यांनी या क्षणांची अनेक सुंदर छायाचित्रे त्यांच्या चाहत्यांसह त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहेत.



आता त्यांच्या हनिमूनचे फोटो समोर आले आहेत.



विघ्नेश आणि नयनताराने हनीमूनचे फोटो पोस्ट केले, ज्यामध्ये हे जोडपे रोमँटिक दिसत होते.



नयनतारा पिवळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे तर, विग्नेश टी-शर्ट आणि पॅन्टमध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.



दोघेही निसर्गरम्य थायलंड या देशामध्ये आपला हनिमून साजरा करत आहेत.



त्यांचे हे फोटो थायलंडमधील रिसॉर्टमध्ये काढण्यात आले आहेत.



अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती 'जवान' चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.



पुढील वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.