बॉलीवुडमधील सुंदर आणि हटके अभिनेत्रींपैकी एक म्हणजे चित्रांगदा सिंह. अलीकडे अधिक सिनेमांत झळकत नसली तरी चाहत्यांमध्ये ती प्रसिद्ध आहे. तिचे नुकतेच काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये ती एका सुंदर ट्रेडीशनल वेअरमध्ये दिसत आहे. दिवाळीमुळे सर्वत्र फेस्टीव्ह वातावरण आहे. त्यामुळे चित्रंगदाही तशाच लूकमध्ये दिसते आहे. याशिवाय ती वेस्टर्न लूकमध्येही दिसत असते. ती अलीकडे सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या लूक्समध्ये फोटो पोस्ट करत असते. तिच्या आगामी सिनेमाची अनेक चाहते वाट पाहत आहेत.