पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash.com

महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Image Source: unsplash.com

राज्यातील महत्त्वाच्या संस्था, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Image Source: unsplash.com

या सर्व ठिकाणी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Image Source: unsplash.com

भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ हवेतून क्षेपणास्त्रं डागून बेचिराख केले होते.

Image Source: instagram

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानी सैन्याला मोठा झटका बसला होता.

Image Source: unsplash.com

भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान खडबडून जागा झाला होता.

Image Source: unsplash.com

पाकिस्तानी सैन्याने सीमेवर सैन्याची आणि युद्धसामुग्रीची जमवाजमव सुरु केली आहे.

Image Source: unsplash.com

या पार्श्वभूमीवर भारतीय वायू दलाला केंद्र सरकारने खुली सूट दिली आहे.

Image Source: unsplash.com