सोफिया कुरेशी या मूळची गुजरातची आहे.

Published by: जयदीप मेढे

सोफिया कुरेशी यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला.

त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

एका माहितीनूसार सोफियाचे आजोबा देखील सैन्यात होते आणि तिच्या वडिलांनी काही वर्षे सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणूनही काम केले होते.

सोफिया यांनी 1999 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाली.

सोफिया यांनी 1999 मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतले.

2006 मध्ये, सोफियाने काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय तुकडीचे नेतृत्व केले तेव्हा त्या देखील चर्चेत आल्या.