पहलगाम हल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबध अधिक ताणले गेलेले असताना दोन्ही देशांमध्ये युद्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash.com

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील महत्त्वाच्या संकेतस्थळांवर 10 लाखांहून अधिक सायबर हल्ले झाले आहे.

Image Source: unsplash.com

या घटनेनंतर आता पाकिस्तानातील महत्त्वाच्या संकेतस्थळांवर सायबर प्रतिहल्ले झाल्याची माहिती उघड झाली आहे.

Image Source: unsplash.com

'सायबर कमांडर' या नावाखाली हे प्रतिहल्ले केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Image Source: unsplash.com

यात कराची, खैबर पख्तूनख्वा, मुलतान, पेशावर, फैसलाबाद, अबोटाबाद येथील विद्यापीठे आहेत.

Image Source: unsplash.com

वैद्यकीय डेटाबेस, ‘दस्तक’ या वाहन परवाना पोर्टल, फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू आणि विविध सरकारी ईमेल सर्व्हर यांचा समावेश होता.

Image Source: unsplash.com

भारतावर प्रामुख्याने हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्वेतील देश, मोरोक्को आणि इंडोनेशिया या देशांतून होत आहेत.

Image Source: unsplash.com

या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या अनेक हॅकर्स गटांनी स्वतःला विशेष नाव दिले आहे.

Image Source: unsplash.com

त्यातील ‘टीम इन्सेन पीके’ हा पाकिस्तान स्थित गट सर्वाधिक सक्रिय आहे.

Image Source: unsplash.com

सायबर कमांडरकडून या हल्ल्याला प्रतिउत्तर देत, या हॅकर्स गटाकडून पाकिस्तानातील 1500 संकेतस्थळ हॅक करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

Image Source: unsplash.com

या संकेतस्थळांवर 'हिंदुस्तान जिंदाबाद'चे संदेश अपलोड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Image Source: unsplash.com