प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

मौनी अमावस्येला महाकुंभात तिसरं शाही स्नान सुरू आहे.

यासाठी जगभरातील कोट्यवधी भाविक स्नान करण्यासाठी आले आहेत.

Published by: स्नेहल पावनाक

मौनी अमावस्येच्या स्नानासाठी येथे 8 ते 10 कोटी भाविक पोहोचले होते.

मात्र, या गर्दीमुळे संगमावर चेंगराचेंगरी झाली.

Published by: स्नेहल पावनाक

या दुर्घटनेमध्ये मोठ्या संख्येने भाविक जखमी झाल्याची माहिती आहे.

Published by: स्नेहल पावनाक

महाकुंभात मौनी अमावस्येच्या स्नानाच्या आधी चेंगराचेंगरी झाली.

Published by: स्नेहल पावनाक

साधु-संत आणि श्रद्धाळू संगमवर स्नान करण्यासाठी मध्यरात्री निघाले होते, त्यावेळी ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली.

Published by: स्नेहल पावनाक

चेंगराचेंगरीमध्ये अनेक भाविक जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक

चेंगराचेंगरीनंतर भाविकांचं सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसत आहे.

Published by: स्नेहल पावनाक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची माहिती घेत भाविकांना योग्य ती मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Published by: स्नेहल पावनाक

दरम्यान, चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे आखाडा परिषदने अमृत स्नान रद्द केलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक

याशिवाय, प्रशासनानेही भाविकांना स्नान करण्यासाठी संगमावर न जाण्याचं आवाहन केलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक