S-400 ला जगातील सर्वोत्तम एअर डिफेन्स सिस्टीम मानले जाते.

ही सिस्टीम रशियाने तयार केली आहे.

सुमारे 5 अब्ज डॉलर्सच्या करारानंतर 2018 मध्ये भारताने ही मिसाईल सिस्टीम खरेदी केली. या करारात भारताने 5 युनिट S-400 मिसाईल सिस्टीम्स खरेदी केल्या.

S-400 ही मोबाईल लाँग-रेंज सर्फेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे.

ही प्रणाली स्टेल्थ फाइटर जेट, बॉम्बर्स, क्रूज व बॅलिस्टिक मिसाईल्स आणि UAV (ड्रोन) यांना लक्ष्य करू शकते.

यात चार वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स असतात, ज्या 400 किमी अंतरावरील टार्गेटवर हल्ला करू शकतात.

यात दोन स्वतंत्र रडार सिस्टीम्स आहेत, ज्या 600 किमीपर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा शोध घेऊ शकतात.

एकावेळी 80 हवाई टार्गेट्स वर नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकते.

सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर केवळ 3 मिनिटांत फायरिंगसाठी तयार होते.

यामुळे शत्रूचा हल्ला तत्काळ निष्फळ केला जाऊ शकतो.