महाराष्ट्रात अनके ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करत रंग खेळला जातो. मात्र नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, लातूर या भागात होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. नाशिकमधील तीनशे वर्षांची परंपरा असलेला हा ऐतिहासिक पेशवेकालीन रहाड रंगोत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे. राज्यातील विविध भागात विविध पद्धतीने धुळवड साजरी झाली. भारतातील सणांना रंगांचं एक वेगळं आकर्षण आणि महत्व आहे. होळी (Holi 2022) हा सण देशभरात साजरा केला जातो. होळी सण म्हटला की अनेक रंग डोळ्यांसमोर येतात. पण त्यातूनही पांढऱ्या रंगाला विशेष पसंती दिली जाते. होळीचा सण सुद्धा इतर सणांप्रमाणेच आनंद घेऊन येत असला तरी, या सणाला लोक आपापसांतील मतभेद विसरून एकमेकांना शुभेच्छा देतात. रंगांची उधळण करतात. आनंद साजरा करतात.