22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यानंतर अयोध्येतील राम मंदिरात हा पहिला रंगोत्सव साजरा केल्याचं पाहायला मिळालं यावेळी मंदिरात श्रीरामाला रंग लावून रंगोत्सव साजरा केला दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करुन धुळवड साजरी केली जाते. धुलिवंदनाच्या दिवशी एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी केली जाते. हल्ली धुळवडीच्या दिवशीच रंगपंचमीसारखा रंगोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण देशात हा उत्सव जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. (Photo : twitter/ShriRamTeerth)