देशभरात घरोघरी बाप्पांचं आगमन! राज्यासह देशभरात आज गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय. सार्वजनिक मंडळांपासून ते घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. या निमित्ताने सगळीकडेच गणेशोत्सवाची धामधूम आणि उत्साह पाहायला मिळतोय. सकाळपासून श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेपासून गणपतीची आरती मोठमोठ्या गणेश मंडळांत पार पडली. एकंदरीतच सर्वत्र आज आनंदाचं, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. राज्यभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत.