आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकजूट करत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. (Photo Credit : PTI) पण आता याच इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. (Photo Credit : PTI) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेत इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.(Photo Credit : PTI) पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जींनी केली आहे. (Photo Credit : PTI) त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(Photo Credit : PTI) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. (Photo Credit : PTI) त्या म्हणाल्या की, माझी काँग्रेसशी कोणतीही चर्चा झालेली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हणत आले आहे. (Photo Credit : PTI) देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू. (Photo Credit : PTI) मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, (Photo Credit : PTI) पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही(Photo Credit : PTI)